बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचाराला पंतप्रधान मोदी यांनी येणे पुन्हा रद्द झाले आहे. त्यांच्या ऐवजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत.
शहापूर येथे 17 तारखेला योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. नरेंद्र मोदी येतील असे पहिल्यांदा जाहीर करण्यात आले होते पण बेळगावला येण्याचा त्यांचा दौरा पुन्हा रद्द झाला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर बेळगाव मध्ये योगी यांनी सभा घेतली होती आता त्यांचा हा दुसरा दौरा असेल.
मोदी हे 18 रोजी चिकोडीला जाऊन सभा घेणार आहेत.
बेळगावच्या उमेदवारास मोदी यांनी येणे पहिल्यापासून पाहिजे होते पण निवडणूक जाहीर झाली तेंव्हापासून मोदींनी येणे टाळले आहे. उमेदवारी देण्यावरून नाराज स्थानिक नेते यामुळे त्यांचा पहिला व दुसरा दौरा रद्द झाला होता आणि आता तिसर्यांदाही तो रद्द झाला.
मोदी जी छाप पाडू शकतात तशी छाप योगीजी पाडू शकतील का? हे माहीत नसून या बदलाने आधीच टेन्शन मध्ये असलेल्या भाजप च्या बेळगावच्या उमेदवाराचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता आहे.