भाजपचे लोकसभा उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी किंवा घटप्रभा मध्ये होणार असल्याची शक्यता असताना काँग्रेस कडुन देखील स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांना चिकोडीत प्रचाराला आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली असून चिकोडी।लोकसभा मतदार संघात यावेळी प्रियंका गांधी वाडरा यांना प्रचाराला बोलवलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे प्रचार करणार असून प्रियांका यांची सभा बागलकोट आणि चिकोडीला मिळावी यासाठी हाय कमांड कडे मागणी करत प्रयत्न चालवले आहेत.
18 एप्रिल रोजी मोदी यांची सभा होणार असून त्याला काउंटर म्हणून प्रियंका यांची सभेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत सध्या प्रियंका यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून त्यांच्या कडे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची छबी आहे या लोकप्रिय तेच फायदा हुक्केरी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
चिकोडी लोकसभा मतदार संघात काँग्रेस मध्ये कोणतेच मतभेद नसून सर्व जण जोमाने कामाला लागले आहेत असेही हुक्केरी यांनी सांगितले आहे.