दहा हजार हुन अधिक प्रकारचे दागिने असलेल्या स्वर्ण शृंगार शो रूमचा शुभारंभ उत्साहात करण्यात आले.एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि विविध प्रकारचे कॉस्मेटिकचे दालन स्वर्ण शृंगार शो रूमच्या रूपातून बेळगाव मधील ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.दैनिक तरुण भारत चे संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून गणपत गल्लीतील या शो रूमचे उदघाटन झाले.यावेळी स्वर्ण शृंगारचे स्वरूपसिंह सोळंकी, राज बोराना उपस्थित होते.
शुभारंभ ऑफर म्हणून खास ग्राहकांसाठी डबल धमाका, एक गिफ्टवर एक गिफ्ट फ्री तसेच कोणत्याही खरेदीवर 25 टक्के डिस्काउंट अश्या अनेक स्कीम शो रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत.कलकती बँगल केवळ 2000 रुपयांत उपलब्ध असून तसेच स्वर्ण शृंगार कारखान्यात तयार केलेले सर्व दागिने फॅक्टरी रेट मध्ये मिळणार आहेत. शो रुम मध्ये दहा हजार हुन अधिक दागिने उपलब्ध आहेत.दुलहन सेट,पिकॉक सेट,पिकॉक बँगल्स जोधपुरी जयपुरी बेंगल्स सर्व प्रकारचे स्टोन सेट,पोवळाचे दागिने,मंगळसूत्र बांगड्या,पटली मोहनमाळ शाहीहार,अंगठ्या आदी नमुन्याचे दागिने उपलब्ध आहेत.
सध्याच्या काळात वाढत्या चोऱ्यामुळे सोन्याचे दागिने बाहेर घालून फिरणे धोक्याचे बनले असून अश्या परिस्थितीत विविध ब्रँडचे कॉस्मेटिक दागिने या दालनात उपलब्ध आहेत याचा बेळगावकर जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकानी केलं आहे.यावेळी लक्ष्मण बोराना ईश्वर सिंह राठोड,करणं प्रजापत हणमंत सिंह दहिया,मोहन पुरोहित सुभाष आदी उपस्थित होते.