बेळगाव शहराबरोबरच संपूर्ण उत्तर कर्नाटकाला आजपासून सलग तीन दिवस उष्णतेच्या वाफाचा त्रास सहन करावा लागणार आहे. हवामान खात्याने तसे सांगितले आहे. कमाल तापमान वाढू लागले असल्याने उन्हाच्या झळा वाढलेल्या असताना त्या वाफेत रूपांतर होऊन चटके देणार आहेत, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
या महिन्यात शहराचे तापमान जास्तच वाढले. गुरुवारी 40 अंशपर्यंत तापमान गेले होते. शुक्रवारी सुद्धा 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून याचाच फटका बसू शकेल असा अंदाज आहे.
यावर्षी उष्णतेच्या बाबतीत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ नागरिकांना त्रास करीत आहे. वळीवाचा पाऊस सुद्धा न आल्याने उष्णतेने नागरिक हैराण होत आहेत.
घ्यायची खबरदारी
1. सकाळीच सर्व कामे उरकून घ्या
2. दुपारी 12 ते 4 याकाळात बाहेर फिरणे टाळा
3. बाहेर फिरायचेच झाल्यास छत्री, टोपी अशा साधनांचा वापर करा.
4. पाणी भरपूर प्या.
5.उष्णतेच्या वाफेचा सामना करावा लागल्यास लगेच अंगावर पाणी ओतून घ्या किंव्हा आंघोळ करा
6. अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.