बेळगावचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांना ते करत असलेल्या सामाजिक कामाची पोचपावती पुरस्कारांच्या माध्यमातून मिळाली आहे. मात्र आज बेळगाव येथील कोर्ट आवारामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांना पोचपावती मिळाली त्याची सगळीकडे चर्चा सुरू होती.
नेहमी भुयारी मार्गाच्या ठिकाणी झोपून राहणाऱ्या एका व्यक्तीने बुधवारी एक वेगळीच कृती करून सगळ्यांची नजर आपल्याकडे ओढून घेतली. सतत तोंडात बिडी घेऊन भुयारी मार्गावर पडून राहणाऱ्या या व्यक्तीबद्दल कोणी चांगले बोलत नव्हते. काही काम धंदा न करणाऱ्या आणि कसलाही संबंध नसताना विनाकारण पडून करणाऱ्या व्यक्तीने मात्र बुधवारी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतली आहेत.
समितीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरणार हे पाहण्यासाठी माध्यमांचे पत्रकार कोर्टामध्ये उपस्थित होते. यावेळी माजी महापौर विजय मोरे या ठिकाणाहून जात होते. पत्रकारांना पाहिल्यानंतर विजय मोरे बोलण्यासाठी येथे आले असता भुयारी गटारात झोपलेल्या त्या व्यक्तीने लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली आणि आपल्या खिशातील पन्नास रुपये काढून विजय मोरे यांच्या खिशात घातले .यावेळी सर्व पत्रकार आवाक झाले होते, रोज लोळत पडणारी ही व्यक्ती विजय मोरे आल्यानंतरच कुठून येऊन आपल्या खिशातील पन्नास रुपयाची नोट काढते आणि विजय मोरे यांच्या खिशात घातले, हे कसले पैसे काय असे विचारले असता हसून तो निघून गेला पत्रकारांनी विजय मोरे यांचे सामाजिक काम माहीत असल्यामुळेच त्यांनी मदत केली असे बोलून दाखवले. मोरे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये असतात कदाचित कोणत्यातरी टप्प्यावर त्याला मदत केली असावी त्यामुळे त्यांनाही मदत 50 रुपयांच्या निमित्ताने परत केली असेल असे विजय मोरे यांनी सांगितले .
मोरे यांचे काम बघून नेहमीच अनेक लोक त्यांना पैसे देतात या पैशांचा योग्य उपयोग होईल आणि सामाजिक उपक्रमांसाठी ते पैसे वापरले जातील याची खात्री त्यांना असते. वेडसर समजल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून ही मदत झाल्यामुळे विजय मोरे यांना एक पोचपावतीच मिळाल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.