राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये स्मार्ट क्लासरूम ची सुरुवात बेळगावच्या अतिशय नावाजलेल्या अशा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ने विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी स्मार्ट क्लास ही आधुनिक यंत्रणा सुरू केली आहे.
आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या तंत्रात बदल करून त्यांना नवीन प्रकाराने शिक्षण देण्याचे ध्येय सुरु केले आहे. जुन्या पद्धतीच्या क्लासरूम स्मार्ट क्लास रूम मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूपांतरित करण्यात आले आहेत, अशी माहिती प्राचार्य सौम्यब्राता धार यांनी दिली आहे .
स्मार्ट क्लासरूम साठी 18.9 लाखाचा खर्च करण्यात आला आहे.