चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजपचं तिकीट हुकेलेल्या माजी खासदार रमेश कत्ती यांनी मोठं वक्तव्य केल आहे. तिकीट हुकल्याने नाराज नसून देश आणि मोदी मुख्य आहेत असं म्हटलं आहे.या वक्तव्य नंतर ते काँग्रेस मध्ये जातील काय असे अंदाज बांधले जात होते त्यावर वरील वक्तव्याने एक प्रकारे पूर्ण विराम दिला आहे.
सोमवारी सकाळी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे बेळगाव ला आले असता त्यांनी वक्तव्य केले आहे.मोदी आमचे नेते असून येडियुरप्पा येथे नाराजी दूर करण्यासाठी आले नाहीत भाजपच्या उमेदवाराना जिंकवायला आले आहेत असेही ते म्हणाले.
तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे भाजप नेते हे व्यवस्थित करतीलच या शिवाय मी बंडखोरी करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे त्यांनी नमूद केलं.
दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी देखील चिकोडी बेळगावचे काँग्रेस उमेदवार बदलणार नाहीत असं वक्तव्य रविवारी रात्री केलं होतं त्या नंतर कत्ती यांच्या या वक्तव्या नंतर कत्ती बंधूंची नाराजी दूर झाली की काय?अशी चर्चा रंगत आहे.