महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज बुधवारपासून युवा समिती आणि इतर समिती कार्यकर्त्यानी खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून आजपासून अर्ज भरणा करण्यात येत आहे. 25 हून अधिक जणांनी अर्ज भरणा करण्याचा निर्णय आज एका दिवशी घेतला होता.
याप्रसंगी ज्येष्ठ सीमा तपस्वी मधू कणबर्गी उपस्थित होते . काही उमेदवारांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन आपले अर्ज भरले आहेत .यामध्ये युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके पत्रकार शिवराज पाटील धनंजय पाटील आणि विनायक मोरे इतर व्यक्तींचा समावेश होता मधु कणबर्गी यांचे योगदान मोठे आहे अनवाणी पायाने चालून सीमाप्रश्न सुटेपर्यंत चप्पल वापरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेले मधु कणबर्गी सीमालढ्यात आदराचे स्थान आहेत .त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊन अर्ज भरणा करण्यात आला आहे.
त्यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि सीमा प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच उमेदवाराला मतदान करू नका नोटाचा प्रचार करा अशी जागृती मोहीम केल्याप्रकरणी मधु कण बर्गी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचे कामकाज सुरू आहे. त्यांनी दिलेले योगदान पाहून युवा कार्यकर्त्यांनी त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.