बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवार उभे आहेत. मात्र राष्ट्रीय पक्ष मराठी मतांसाठी जोगवा मागत फिरत आहेत. मात्र येथील मराठी बहुभाषिक असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक उमेदवार उभे करून आपला मराठी बाणा आणि देशाचे लक्ष या सीमा प्रश्नाकडे वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 40 हून अधिक उमेदवार दिले आहेत.
कधी नव्हे ते मराठीचा पुळका आलेल्या राष्ट्रीय पक्षांनी मराठीची मते बळकावण्यासाठी आता चांगलीच प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती तर्फे अशा राष्ट्रीय पक्षांना भीक न घालता केवळ समितीच्या उमेदवारांना मत देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्याला विरोध करत राष्ट्रीय पक्षांनी काही मुद्दे स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. विशेष करून राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी केलेले पाच प्रश्नांचाही खुलासा द्यावा अशी मागणीही शुभम शेळके यांनी केली आहे.
कोणतीही निवडणूक आली की शिवाजी महाराज हे लिंगायत आहेत असे खासदार सांगतात याचा खुलासा त्यांनी सर्वांसमोर करून द्यावा याचबरोबर टिळक यांनी बेळगाव कर्नाटकातच राहू दे असे म्हटले असा जावई शोध लावण्यात आला आहे. याच बरोबर बेळगाव महानगरपालिकेत 1965 झाली सर्वानुमते ठराव करून भगवा झेंडा मनपावर लावण्यात आला होता. तो ध्वज कपट बुद्धीने काढण्यात आला आहे. जर हे खासदार निवडणूक जिंकून येतील तेव्हा पुन्हा त्याच आयटीत भगवा ध्वज मनपावर लावणार आहेत का? तसेच बेळगावचे बेळगावी करण्यात आले आहे ती चूक देखील खासदार दिल्लीत जाऊन सुधारणार आहेत का? या साऱ्या मागण्या जर खासदार मान्य करत असतील तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ नाहीतर यापुढे त्यांना धूळ चारण्यासाठी आम्ही सज्ज राहणार आहोत असा इशाराही देण्यात आला आहे.
येळ्ळूर प्रकरणी आपल्या भोळ्याभाबड्या जनतेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. मात्र याच नेत्यांनी त्यावेळी असे काही घडलेच नाही असा कांगावा केला होता. मात्र याचे पुरावे आम्ही न्यायालयात दाखल केले आहेत. त्यामुळे यांचे पितळ लवकरच उघडे पडून आपल्या जनतेला न्याय मिळणार आहे हे असे देखील शुभम शेळके यांनी सांगितले या सर्व गोष्टींचा विचार करून खासदारांनी किंवा राष्ट्रीय पक्षांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.