महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या 45 उमेदवारांची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद पत्रक काढल्या प्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना नोटीस बजावली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आचार संहिता भंग आणि सॆक्शन 125 उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नोटीस मिळताच बारा तासाच्या आत उत्तर द्या असे देखील म्हटलं आहे.दळवी यांना सोमवारी सकाळी सात वाजता नोटीस मिळाली असून त्यांनी सकाळी अकरा वाजता या नोटिशीला उत्तर देखील दिल आहे.
दळवी यांच्या वतीने वकील महेश बिरजे यांनी या नोटिशीला उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती 1956 पासून शांततेच्या मार्गातून लोकशाही मार्गातून लढा देत आहे.भाषावार प्रांत रचने नंतर कर्नाटक आणि केंद्राने केलेल्या अन्याय विरुद्ध लढा देत आहे त्यामुळे या निवडणूक काळात कोणत्याही पद्धतीने दोन भाषा जात आणि धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले नाही.कोणताही निवडणूक आचार संहिता भंग केला नाही असे नोटिशीला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
20 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि पत्रकात कोणत्याही प्रकारच्या आचार संहितेचे उल्लंघन केलेलं नाही स्थानिक वर्तमान पत्रे आणि मीडियावर आलेल्या बातम्यांच्या आधारावर नोटीस दिली असली तरी धर्म जात पात समाजाला उद्देशून बोलून कायद्याचे उल्लंनघन केलेलं नाही असा निर्वाळा त्यांनी दिलाय.
सदर नोटीस खोटी काल्पनिक आणि आधार रहित असून ही या अमान्य आहे मध्यवर्ती अध्यक्ष 2019 ला कोणतीच निवडणूक लढवत नाहीत त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रश्नच उदभवत नाही नोटीस मागे घ्या अशी देखील उत्तरात मागणी केली आहे.