Saturday, May 4, 2024

/

असा होणार समिती उमेदवारांचा प्रचार!

 belgaum

मातृभाषेच्या अस्तित्वासाठी लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे 45 उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे राबवण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली या बैठकीत प्रचार रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी दोन दिवसात सर्व 45 उमेदवारांची आणि समिती नेत्यांची व्यापक बैठक घेतली जाणार आहे त्या नंतर धर्मवीर संभाजी उद्यानात किंवा अन्यत्र ठिकाणी सर्व उमेदवारांची मोठी जाहीर सभा घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

मध्यवर्ती समितीचे रंगुबाई पॅलेस हे कार्यालय सर्व उमेदवारांचे प्रचार कार्यालय असून गावोगावी बैठका प्रचार फेऱ्या देखील काढणार आहोत एकूणच जंगी प्रचार करून आपली वोट बँक कशी वाचवली जाईल यावर भर देणार असल्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

Mes nominations

 belgaum

(File photo:युवा समितीचे उमेदवार अर्ज दाखल करताना सीमा तपस्वी मधू कणबर्गी यांचा आशीर्वाद घेतेवेळी)

सात युवा करणार जंगी प्रचार..

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे एकूण 57 उमेदवारात सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत त्यांच्या सह सात युवा समितीचे उमेदवार देखील आपला जंगी प्रचार करणार आहेत युवा समितीच्या वतीने पश्चिम भागात दोन जाहीर सभा तर उत्तर आणि दक्षिण मतदार संघ पिंजून काढला जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.