लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू व्यवसायावर आणि जुगार अड्ड्यावर अबकारी खात्याने करडी नजर ठेवली आहे. मागील आठवडाभरात अनेक जुगार अड्ड्यावर धाड टाकून पंधराहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर मटका बुकींनाही अटक करण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच अबकारी खाते आणि पोलिस खात्याने अवैद्य धंद्यावर करडी नजर ठेवली असून अनेक अवैद्य धंदे चालक अडचणीत आले आहेत .
बेळगाव परिसरातील धाब्यावर मदिरा विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते या दरम्यान पोलीस खात्याने असे धाबे दुकाने हॉटेल्स यांच्यावर लक्ष ठेवले आहे. यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहने बेकायदेशीर मद्याची तस्करी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी उभे करण्यात आले आहेत.
पोलीस पथकाने बराच मद्य साठा जप्त केला आहे. मद्य विक्री केंद्रे बियर बार हॉटेल विहित वेळेत चालू बंद व्हावेत यासाठी पोलीस दररोज गस्त घालून संबंधितांना सूचना करत आहेत. दारू विक्री परवाना नसलेल्यांना आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
गावठी दारू व गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. यापुढे अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सध्या लोकसभा निवडणुकी मुळे अनेक गैर प्रकार उघडकीस येत आहेत. यावर चाप ठेवण्यासाठी पोलिसांनी आता गस्त वाढवून असे कृत्य करणाऱ्यांना चांगली अद्दल घडवली आहे. यापुढेही निवडणूक काळात गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता सध्या पोलिस घेत आहेत.