रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बेळगाव चोरला रोड वर कुणकुंबी जवळ घडली आहे.
वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कणकुंबी जवळील फॉरेस्ट नर्सरी आणि डेल्टा रिसॉर्ट जवळील रस्त्यावर सदर बिबट्याचे सहा महिन्याचे पिल्लू आपल्या आई सोबत रस्ता ओलांडते वेळी अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत या पिल्लाचा मृत्यू झाला आहे.
जंगल भागात वन्य जीवींचा रस्त्याजवळून सतत वावर असतो त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवणे गरजेचे आहे.वन खात्याच्या या जंगलातील रस्त्यावरून वाहने सावकाश चालवा अश्या आशयाचे अधिकाधिक फलक लावणे जरुरी बनले आहे.ए सी एफ सी बी पाटील आर एफ ओ एम बी कुसनाल आदी वन अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे