कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी आयकर खात्याने धाडी घातल्या असून चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या समर्थकाच्या घरावर आय टी विभागाने धाड टाकली आहे.
पहिल्या दर्जाच्या कामांचा ठेकेदार असलेल्या प्रकाश वंटमत्ते यांच्या घरावर बुधवारी सकाळी धाड टाकून चौकशी सुरू केली आहे.प्रकाश वंटमत्ते हे चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांचे जवळचे समर्थक असल्याची माहिती मिळाली आहे.
चिकोडी येथील इंदिरानगर गेट जवळ असलेल्या घरात छापा टाकून चौकशी सुरू करण्यात आली आहे आयकर खात्याच्या पाच अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली आहे.
मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पी ए जवळीक असलेल्या घरावर आयकर खात्याने छापे मारी केलेलं प्रकरण ताजे असताना कर्नाटकात बेळगाव चिकोडी काँग्रेस खासदारांच्या समर्थकांवर रेड पडली आहे.या रेडची चर्चा सुरू आहे.