Saturday, December 28, 2024

/

जो जिता वही सिकंदर-ग्राऊंड रिपोर्ट-2

 belgaum

बेळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा अस्मितेचीच निवडणूक आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी अस्मितेची निवडणूक होणार आहे .भाजपचे सुरेश अंगडी आणि काँग्रेसचे व्ही एस साधूंना वर हे दोन उमेदवार वगळता इतर 47 उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीने उभे केले आहेत, समिती उमेदवारांचा उद्देश फक्त या निवडणुकीकडे राष्ट्रीय लक्ष वेधून घेणे इतकाच असल्यामुळे या वेळी मराठी भाषिकांची निवडणूक अस्मितेची असणार आहे. समितीच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे राष्ट्रीय पक्षांची तारांबळ उडाली असून त्यांनी जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याच्या या समितीच्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे.

खरेतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 101 उमेदवार उभे करण्याचा चंग बांधला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे उमेदवारांची संख्या कमी झाली असली तरी राष्ट्रीय पक्षांना आव्हान देण्यासाठी ती पुरेशी असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना परिस्थिती अवघड आहे. सुरुवातीला वाजपेयी त्यानंतर येडीयुरप्पा आणि त्यानंतर मोदींच्या लाटेवर निवडून आलेले आणि सलग तीन वेळा भाजपचे खासदार बनलेल्या सुरेश अंगडी यांची चिंता वाढली आहे.याचबरोबरीने कॉंग्रेसचे नवा चेहरा म्हणून उभे असलेले  साधूंनावर यांची परिस्थिती कठीण  झाली आहे.

Map belgaum lokssbha
या  लोकसभा मतदार संघामध्ये  बेळगाव ग्रामीण बेळगाव उत्तर बेळगाव दक्षिण गोकाक सौंदत्ती बैलहोंगल आणि रामदुर्ग हे विधानसभा मतदारसंघ येतात या सर्व मतदारसंघांमध्ये वर्चस्व गाजवणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र ही निवडणूक मराठी मतांवर निर्णायक ठरते. मराठी एकगठ्ठा मते ज्याला पडतात तोच निवडून येऊ शकतो. अशा वातावरणात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उभे केल्यामुळे मराठी मते विभागली जाणार असून राष्ट्रीय पक्षांची चिंता वाढली आहे.

यापूर्वी मराठी मतांच्या जोरावर खासदार झालेल्या व्यक्तीने सीमाभाग महाराष्ट्रात  समाविष्ट होण्याच्या मराठी माणसांच्या भूमिकेवर कधीही लोकसभेत भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे  यावेळी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे मराठी माणसाकडे मते मागणे अवघड होऊन बसले आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात यापूर्वी काँग्रेसचा विजय होत होता .मात्र मागील तीन वेळा लाटेमुळे भाजप खासदार निवडून येऊ शकले आहेत  निवडून आल्यानंतर विकास कामे केली नाहीत असा आरोप खुद्द भाजपमधील कार्यकर्त्यांनी व  नेत्यांनी केला होता, त्यामुळे उमेदवार बदल व्हावा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती पात्र उमेदवार बदल झाला नाही अशा परिस्थितीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने अतिशय नवा चेहरा दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसतर्फे बेळगाव लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती भाजपची मदत करणार असे चित्र आहे तर  भाजपमधील नाराज व्यक्ती काँग्रेसला मदत करणार असे चित्र आहे, या वातावरणात बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल तो खरा सिकंदर ठरेल अशी परिस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.