वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगाई देवीला वेगळ्या पद्धतीने आरास करून सजवण्यात आले आहे.चैत्र मास गुढी पाडव्याच्या निमित्ताने ही आरास करण्यात आली आहे.
शनिवारी गुढीपाडव्या निमित्ताने श्री मंगाई देवीची विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती.
द्राक्षे आंबे गुलाब गलाटा फुलांचा वापर यात करण्यात आला आहे. द्राक्षांची रास लावण्यात आली आहे आंबे गुलाबाची फुलं आणि गलाट्याच्या फुलांचा हार घालून देवीला सजवले आहे.
मंगाई देवी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यानी चार तास लागून ही आरास केली असून यात 60 किलो द्राक्षे,दोन डझन आंबे,गुलाबाची फुलं आणि दोन हार वापरण्यात आला आहे.