Sunday, January 5, 2025

/

शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा

 belgaum

लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावात दिनांक 23 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या जाहीर प्रचारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवार हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रीय पक्ष्यांबरोबरच इतरांनी ही प्रचाराचा धुरळा पडला. प्रतिस्पर्ध्यांमध्ये जणू काय शर्यतच लागली होती. बेळगाव शहराच्या विविध भागातून प्रचार रॅली व मतदान करण्याचे आवाहन उमेदवार करत होते.

दक्षिण मतदार संघात जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी झाडशहापूर भागात  काँग्रेस साठी पद यात्रा काढली गेल्या आठवडा भरात त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढलाय. पिरनवाडी येथे सचिन गोरले यल्लप्पा पाटील आदींनी पदयात्रा काढत प्रचार केला.समितीच्या वतीने अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी अनगोळ  शहापूर भागात बाईक रॅली काढून समितीसाठी मते मागितली तर शुभम शेळके श्रीकांत कदम धनंजय पाटील विनायक मोरे मारुती चौगुले यांनी ग्रामीण शहरी भागात वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिला.

23 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जाहीर प्रचार रविवार दिनांक 21 रोजी थंडावल्या मुळे शेवटच्या दिवशी अनेकांनी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला. सध्या बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी उचलली असून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कसे मागे टाकता येईल यावरच अधिक तर उमेदवारांनी लक्ष केले आहे.

Canvasing

विशेष करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी शहर आणि तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली होती. तर भाजप आणि काँग्रेस यांनीही जाहीर प्रचारात आपले शक्तीप्रदर्शन दाखवले. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रीय पक्ष प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करून जाहीर प्रचाराच्या तोफा बंद केले आहेत आता यापुढे गुप्त प्रचारावर भर देण्यात येणार आहे प्रत्यक्ष भेटी देऊन प्रचारात आघाडी घेण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होणार आहे.

दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपापले शक्तीं प्रदर्शन करत दुचाकी रॅली काढली रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने दोन्ही पक्षा कडून दुचाकीत दोन लिटर पेट्रोल,जेवण आणि काही रक्कम देऊन गर्दी जमवली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.