आयकर खात्याच्या वतीनं मुद्दामहुन काँग्रेसच्या उमेदवाराना त्यांचा उत्साह कमी करण्याच्या उद्देशाने टार्गेट केल जात आहे.उमेदवारांच्या कार्यालयावर त्यांच्या समर्थकांवर घरा वर आयकर खात्याच्या धाडी केल्या जात आहेत असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी केला आहे.
गुरुवारी सकाळी बेळगाव विमानतळावर आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
आयकर धाडीबद्दल निवडणूक आयोगाला तक्रार दिली असता कोणतीच दखल घेतली जात नाही केवळ पराभवाच्या भीतीने राज्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होत आहे या भीतीने आय रेड घातल्या जात आहेत असा देखील आरोप त्यांनी केला.केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे मात्र निकडणुक आयोगाला तक्रार करूनही अद्याप दखल घेतली जात नाही याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हासन मंडया आणि तुमकुर मतदार संघातील काँग्रेस जनता दल उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असून ते निवडणूक जिंकतील यात कोणताच संशय नाही अंतर्गत मतभेदांचा यावर कोणताच परिणाम होणार नाही असे ते म्हणाले.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून अनेक मतदार संघात कोट्यवधींची खर्च केले जात आहेत तिकडे आयकर खात्याचे अधिकारी कानाडोळा करत आहेत तिकडे ते का कारवाई करत नाहीत असा प्रति प्रश्न त्यांनी केला. आजच्या घडीला देशात भयमुक्त निवडणूक होत आहे असं मला वाटत नाही