देसुरची पूजा प्रकाश शहापूरकर हिची सिनियर एशियन ज्यूडो चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शुक्रवारी तिने दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रस्थान केले. पूजा ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत असून यापूर्वी तिने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील जुडो स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली आहेत.तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बालिका आदर्शमध्ये झाले असून मराठा मंडळ कॉलेजमध्ये पदवी शिक्षण झाले आहे.
राष्ट्रीय जुडो स्पर्धेत दोन सुवर्ण,चार रौप्य पदके मिळवली आहेत.राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत आठ सुवर्ण पदके मिळवली आहेत.६३ किलो वजनी गटात ती दुबई येथील स्पर्धेत सहभागी होणार आहे.
बेळगाव जवळील देसुर या गावातून पुढे आलेल्या या कन्येची ही भरारी कौतुकास्पद असून तिला या स्पर्धेत उज्वल यश मिळावे हीच शुभेच्छा बेळगाव live सर्व बेळगाव वासीयांकडून देत आहे.