Wednesday, May 1, 2024

/

…तर रमेश यांच्यावर कारवाई

 belgaum

बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी कॉंग्रेसकडे राजीनामा दिला नसल्याने ते सध्या आमच्या पक्षामध्ये आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशात कॉंग्रेसचा उज्ज्वल आणि महत्त्वपूर्ण इतिहास आहे. काही लोक आमच्याकडे येतात आणि जातात. मात्र पक्षात वैयक्तिक बाबीच्या गोष्टी आणणे योग्य नव्हे, असे ते म्हणाले.
रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाला निवडणुकीसाठी चार वर्षांची संधी आहे. या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

G parameshwar
मंड्यातील ऑडिओबाबत मला काहीही माहीत नाही. अभिनेता दर्शनवर उपाय योजले पाहिजेत. ते निवडणुकीच्या प्रचारात माझ्यासोबत होते.

दर्शनने केलेल्या वक्तव्याबाबत कोणतेही पुरावे नसून मुद्दहनुमेगौडा यांनी पैसे घेतलेले नाहीत. ते कॉंग्रेसचे निष्ठावंत खासदार होते, असे डॉ. परमेश्वर यांनी सांगून त्यांचे समर्थन केले. राज्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत असल्याचे ते म्हणाले.

 belgaum

कुटुंबाची भांडणे माध्यमासमोर नकोत

जारकीहोळी बंधूंच्या भांडणांचे महाभारत झाल्यानंतर रमेश आणि सतीश या दोघांबरोबर मी चर्चा केली आहे. यापुढे आपल्या कुटुंबाचा विचार किंवा वाद टीव्ही – मीडिया वा वृत्तपत्र प्रतिनिधींसमोर नको, असे अरभावी आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी शुक्रवारी पत्रकारांकडे सांगितले.
दोघा भावांमध्ये निर्माण झालेला वाद आणि मतभेद मिटवून टाकण्यासाठी भालचंद्र जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला आहे. या वादावर पडदा टाकू या आणि कुटुंबाच्या सर्व गोष्टी वृत्तपत्र, टीव्ही प्रतिनिधींसमोर चर्चा आणायला नकोत, असे ते म्हणाले.
२३ मेपर्यंत कोणत्याही पक्षाने कोणतेही वक्तव्य व्यक्त न करता स्वस्थ बसावे. त्यानंतर सर्व काही चित्र बदलणार असल्याचे भाकित त्यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
एकंदर दोघा भावांमध्ये निर्माण झालेला अनेक दिवसापासूनचा वाद मिटवण्यासाठी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना यात यश येते का, हे पहावे लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.