मागील दोन ते चार दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसाच्या पूर्वी शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला होता मात्र त्यानंतर पाहता पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येते.
पावसाने विश्रांती घेतली तरी अजूनही उष्म्यात वाढ झाली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना अनेकांना छत्री इतर साहित्यांचा वापर करावा लागत आहे.
बेळगावचा पारा 40 अंशावर जाऊन पोचला असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच शहर आणि परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पाऊस पडला की उष्म्यात घट होईल अशी साऱ्यांची आशा होती. मात्र ही आशा फोल ठरताना दिसत आहे.
दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यात पुन्हा वाढ झाली आहे. हीच परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहिली तर याचा फटका शेतकऱ्यांना मात्र सोसावा लागणार आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले होते. मात्र म्हणावा तसा पाऊस नसल्याने ही कामे देखील खोळंबली आहेत. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर वीज खांब तारा तुटून मोठे नुकसान झाले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून उष्णतेचा पारा चढतो आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले होत आहेत. शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला मात्र म्हणावा तसा पाऊस पडला नाही त्यामुळे अनेकांची लाहीलाही होताना दिसत आहे. जर येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास पुन्हा पाण्याच्या समस्येबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
लवकरात लवकर पाऊस पडल्यास शेतातील मशागती व इतर कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे साऱ्यांचा या उष्म्यात कस लागत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक नुकसान झाले मात्र मागील काही दिवसात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा पत्ता नसल्याने उष्म्यात वाढ झाली आहे.