तरुण भारत प्रस्तुत अस्मिता या महिलांसाठीच्या खास मंचने गुढीपाडव्याला प्रथमच बेळगावात महिलांची बाईक रॅली आयोजित केली आहे. हिंदू धर्माचा पहिला सण गुढीपाडवा ला या रॅलीचे खास आकर्षण असणार आहे.
(File photo bike rally)
मुंबई पुणे नागपूर आणि इतर शहरांमध्ये यापूर्वी अशा बाईक रॅली झाल्या आहेत. काही शहरात दरवर्षी न चुकता गुढीपाडव्याला अशा बाईक रॅली काढल्या जातात. यातून महिलांच्या शक्तीचे दर्शन होत असते .या वेळी बेळगाव मध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच सुरू होणार आहे.
यामुळे महिलांच्या बाईक रॅली चे आकर्षण वाढणार आहे. तिसरे रेल्वे गेट पासून सुरु होऊन बाईक रॅली मराठा मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये महिला आपल्या बुलेट व इतर मोटर सायकल घेऊन सहभागी होणार आहेत . बेळगावच्या दृष्टीने हा प्रकार सगळ्यात पहिला आणि नवीन आहे .त्यामुळे गुढीपाडव्याचा सण साजरा करून शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे .असे आवाहन करण्यात आले आहे.