मागील काही दिवसापासून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुरुवारी तर उच्चांकच गाठला आहे. बेळगावचे कमाल तापमान 40 अंश पर्यंत पोचले होते तर किमान तापमान 30 अंश वर ठेपले होते. त्यामुळे अनेकांना लाहीलाहीची जाणीव झाली. घरातून बाहेर पडताना नागरिकांकडून छत्री किंवा इतर साधनांचा आसरा घेत बाजारहाट करण्यात आला.
मागील काही दिवसापासून बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस वाढच होत आहे गुरुवारी तर या वर्षीचा सर्वात असा उच्चांक यांनी गाठला आहे. त्यामुळे यापुढे आणखी उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
अशीच परिस्थिती राहिली तर घरातून बाहेर पडणे सुद्धा मुश्किल होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी वळीवाने हजेरी लावली होती. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. अजूनही जोरदार वळिवाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असतानाच उन्हाचा तडाखा मात्र अनेकांना नकोसे करुन सोडत आहे.
उष्मा थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण होत असतानाच सर्वांचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत, जर पावसाने हजेरी लावली तर त्यात काही प्रमाणात घट होऊन अनेकांना दिलासा मिळणार आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. आणखी काही दिवसात यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आणि आठ दिवसात बेळगावचा पारा 42 वर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. याच दरम्यान अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाच आरोग्य खात्याने कोणतीच दक्षता घेतली नसल्याचे समोर आले आहे. अशी परिस्थिती राहिली तर येत्या काही काळात घरातून बाहेर पडणे देखील अवघड होणार आहे. त्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आता साऱ्यांचे डोळे पावसाकडे लागून राहिले आहेत. जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. मशागत व इतर कामात शेतकरी गुंतला जाणार आहे. त्यामुळे सध्या साऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी पावसाने दडी मारली आहे लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.