बेळगाव जवळील वाघवडे ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालय गावात सुरु करा अन्यथा मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा दिला आहे.
वाघवडे ग्राम पंचायत अस्तित्वात आल्यानंतर मार्कंडेय नगर येथे ग्राम पंचायत कार्यालय सुरु करण्यात आले.मार्कंडेय नगर हे वाघवडे पासून सहा किमी. अंतरावर आहे.वाघवड्याची लोकसंख्या आणि क्षेत्रही मोठे आहे.मार्कंडेय नगरला जाणे वाघवडे ग्रामस्थांना उलटे पडत आहे.
मार्कंडेय नगर येथे ग्राम पंचायत कार्यालय झाल्यामुळे शासकीय योजना आणि इतर बाबींची माहिती मिळत नाही.यापूर्वीही ग्राम पंचायत कार्यालय वाघवडे येथे जनतेच्या सोयीसाठी करावे म्हणून मागणी करण्यात आली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.यासाठी वाघवडे ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेऊन या संबंधी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.निवडणुकीपूर्वी ग्राम पंचायत कार्यालय वाघवडे येथे हलविण्या संबंधी निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाहीच्या उत्सवात ग्रामस्थ सहभागी होणार नाहीत असे वाघवडे ग्रामस्थांनी कळवले आहे.