सात जणांची माघार 58 रिंगणात

0
1125
 belgaum

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज एकूण सात जणांनी माघार घेतली आहे.

अपक्ष आणि राष्ट्रीय पक्ष अशा नावावर निवडणूक लढवणाऱ्या सात जणांचा समावेश आहे राष्ट्रीय पक्षांचे बी फॉर्म उपलब्ध करून न शकलेल्या तसेच अपक्ष उमेदवारांनी माघार निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर त्यांना निवडणुकीतून मुक्त करण्यात आले असून अशा व्यक्तींच्या डिपॉझिट परत मिळणार आहे.

माघार घेतलेल्या मध्ये अशोक पांडप्पा हनजी, मोहन यल्लप्पा मोरे, अशोक भावकांना चौगुले, गुरुपुत्र केंपांना कुलूर, संगमेश नागप्पा चिक्कनरगुंद, संजीव प्रानेश गणाचारी, संजय अशोक पाटील या व्यक्तींचा समावेश आहे.

 belgaum

तरुण उमेदवार युवा समितीचे अध्यक्ष शुभम विक्रांत शेळके(२५) ठरले आहेत.सर्वात ज्येष्ठ उमेदवार लक्ष्मणराव मेलगे (८५) आहेत.नंदा मारुती कोडचवाडकर, दिलशाद सिकंदर तहसीलदार ,लक्ष्मी सुनील मुतगेकर या तीन महिला देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रीय पक्ष वगळता 36 उमेदवारांना अर्जात लिहिल्या प्रमाणे तर अन्य 21अपक्ष उमेदवाराना लॉटरी पद्धतीनं चिन्ह वाटप करण्यात गेली आता उद्या पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.