Sunday, January 5, 2025

/

बेळगाव मतदारसंघात 66.29% मतदान

 belgaum

बेळगाव लोकसभा मतदार संघात 66.29%टक्के मतदान झाले.सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाल्या नंतर अनेक मतदान केंद्रा मध्ये मतदान यंत्रे बंद पडण्याच्या घटना घडल्या त्यामुळे सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या मतदारांना दीड तासांहून अधिक काळ निष्कारण रांगेत तिष्ठत थांबावे लागले.

बेळगाव शहरातील सरस्वती गर्ल्स हाय स्कुल आझम नगर येथील उर्दू शाळा,संगमेश्वर नगर भडकल गल्ली या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्या मुळे मतदारांना  मनस्ताप सहन करावा लागला काही वेळाने मतदान यंत्रे दुरुस्त झाल्यावर मतदानाला पुन्हा प्रारंभ झाला.वडगांव रयत गल्ली येथे मतदान केंद्रात पुरेसा उजेड नसल्याने तेथील मतदान अधिकाऱ्याला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात मतदारांची नावे तपासण्यास लागत होती त्यामुळे मतदारांचा वेळ वाया जात होता.

खासदार सुरेश अंगडी यांनी आपली पत्नी मंगला आणि दोन मुलीसह सदाशिवनगर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांनी देखील सकाळी पहिल्यांदा मतदान करूनच आपल्या दिवसाचा प्रारंभ केला.प्रत्येक मतदान केंद्रावर यावेळी दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात आली होती जेष्ठ नागरिकाना रांगेत न थांबता थेट मतदान करण्यास सोडण्यात येत होते.

Belgaum voting

दुपारी उन्हाचा तडाखा वाढणार याचा अंदाज असल्यामुळे मतदारानी सकाळी 8 ते 12 या वेळेतच मतदान केंद्रावर गर्दी केली होती अनेक शतायुषी मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.बेळगाव शहरात तीन तृतीयपंथीनी देखील प्रथमच मतदान केलं.बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या हनुमान नगर येथील मतदार केंद्रावर आपल्या कुटुंबियांसह मतदान करून बाहेर आल्या नंतर रांगेत उभारलेल्या मतदारांना काँग्रेस ला मते घाला असे आवाहन केले याबाबतची माहिती फ्लाईनग स्कॉड ला मिळताच त्यांनी आचार संहिता भंग प्रकरणी कॅम्प पोलीस स्थांनकात हेब्बाळकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

प्रचाराच्या दरम्यान देखील मतदारात म्हणावा तेवढा उत्साह दिसत नव्हता त्याचाच प्रत्यय मतदानारोजी आला त्यामुळे बेळगाव शहरात मागील वेळे पेक्षा आणि यावेळी 8 मतदार संघा पैकी कमी मतदान झाले आहे तर बेळगाव ग्रामीण मतदार संघात सर्वाधिक मतदान झाले.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात  66.29% झाले आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान बैलहोंगल मध्ये -70.00% तर सर्वात कमी मतदान बेळगाव उत्तर मध्ये  61.72%

अरभावी-67.70%
गोकाक -65.90%
बेळगाव उत्तर – 61.72%
बेळगाव दक्षिण – 62.72%
बेळगाव ग्रामीण -68.92%
बैलहोंगल-70.00%
सौन्दत्ती- 69.64%
रामदुर्ग-64.87%

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.