बेळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले सर्वच छानणीत 65अर्ज वैध 2 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी 42 असे एकूण 76 अर्ज 67 उमेदवारांनी दाखल केले होते.
शुक्रवारी सकाळी या सर्व अर्जांची जिल्हाधिकारी कार्यालयात छानणी करण्यात आली जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी डॉ विशाल रवी निवडणूक निरीक्षक दुबे यांच्या नेतृत्वाखाली अर्जांची तपासणी करण्यात आली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया तब्बल साडे चार तास साडे तीन वाजे पर्यंत चालली होती.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात राष्ट्रीय पक्ष वगळता सर्वच अपक्ष उमेदवारांनी हजेरी लावली होती.
दयानंद चिकमठ बैलहोंगल आणि चव्हाट गल्लीतील
खुर्शीद बानू नदाफ यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.आता 8 एप्रिल रोजी दुपारी तीन पर्यंत अर्ज माघारीची मुदत असून त्यानंतर चिन्हे वाटप केली जाणार आहेत त्यानंतर प्रचाराला सुरुवात केली जाणार आहेत.अर्ज छाननी प्रक्रियेत जवळपास आठ ते दहा उमेदवारांनी उमेदवार सूचक भरण्यास किरकोळ चुका केल्या होत्या अश्यां उमेदवारांना तरतूद दाखवत सर्व जणांचे अर्ज वैध ठरवले.
भाजपच्या उमेदवारांचे वकील छाननी प्रक्रिये दरम्यान अनेक अर्जावर छोट्या छोट्या चुका दाखवत आक्षेप घेत होते मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे असे सांगत सर्वच अर्ज पात्र ठरवले.