बैलाच्या जोड़ीची विक्री करून मिळालेले पैसे एका बड्या सहकारी पतसंस्थेत ठेव स्वरूपात ठेवली असताना सदर रक्कम परत न मिळाल्याने ही गोष्ट जिव्हारी लाऊन घेत किटनाशक पिऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
बेळगाव तालुक्यातील धामणे गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.रामचंद्र गावडू पाटील वय 65 रा.कलमेश्वर गल्ली धामणे असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शेतकरी रामचंद्र पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बैलांची जोडी विकुन त्यांनी 70 हजार रुपये संगोळी रायन्ना पतसंस्थेत एफ डी ठेवली होती. सदर संस्था डबघाईला गेल्याने कित्येकांचे पैसे थक बाकी आहेत. रामचंद्र यांनी बँकेकडे अनेकदा रक्कम मागण्याचा प्रयत्न केला मात्र ती न मिळाल्याने बैल जोडी गेली आणि पैसेही गेले असे म्हणत सदर बाब जिव्हारी लाऊन घेतली होती याच निराशेतून सोमवारी सकाळी गोठ्यात त्यांनी किटनाशक प्राशन केलं होतं.
सकाळी किटनाशक पिताच त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग न होता त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.सदर घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिसांत झाली आहे.
मयत शेतकरी रामचंद्र पाटील यांचे मध्यम वर्गीय गरीब कुटुंब असून त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी सदर शेतकरी कुटुंबाचे सांत्वन केले आहे.संगोळी रायन्ना पथ संस्थेचा बळी असून अश्या अनेक ठेवीदारांचे पैसे बुडावलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.