लोकसभा निवडणूक दिनांक 23 रोजी मतदान होणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली असून संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त आणि कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी विशाल यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत सांगितले आहे
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवार आहेत तर चिकोडी मतदार संघात अकरा उमेदवारांनी आपले नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघात समितीचे उमेदवार थांबल्याने अनेकांची गोची निर्माण झाली आहे असे असले तरी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याचे माहिती आर विशाल यांनी दिली आहे
बेळगाव आणि चिकोडी मतदारसंघात एकूण 37 लाख हून अधिक मतदार आहेत त्यामुळे विविध बुथवर काळजी घेण्यासाठी 37000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा अधिक आहे विशेष करून संवेदनशील भागात पोलिसांची गस्त अधिक प्रमाणात ठेवण्यात आली आहे ते कोठेही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित त्यावर आळा घालून संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही आर विशाल यांनी दिला आहे.
मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर 23 मे रोजी लोकसभा मतदानाचा निकाल लागणार आहे कर्नाटकात इतर ठिकाणी 27 रोजी मतदान होणार आहे विशेष करून बेळगाव जिल्हा कर्नाटकात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व ती तयारी केल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी आर विशाल यांनी नुकतीच घेतलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत ही माहिती दिली