1965 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या आठवणी बेळगाव मध्ये जपण्यात आल्या. या युद्धातील विजयाच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त कोब्रा स्कूल फॉर जंगल वारफेयर अँड टेक्टीस तर्फे 9 एप्रिलला वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले.
9 एप्रिल 1965 रोजी सीआरपीएफच्या दोन बटालियन सरदार आणी टाक पोस्ट वर नेमण्यात आल्या होत्या. या बटालियन नी चौतीस जणांचा खात्मा करून विजयामध्ये योगदान दिले होते.
याचे स्मरण करण्यात आले. विशेष सैनिक महामेळावा आणि क्रीडा उपक्रम घेण्यात आले. सीआरपीएफचे आयजी डॉ टी सेकर यांनी जवानांनी दाखवलेले धैर्य आणि शौर्याचा देशाला अभिमान असल्याचे सांगून या कार्यक्रमात भाषण केले . निवृत्त कमांडन्ट अमृत सोलापूरकर आणि अनिल किशोर यादव यांचा सत्कार करण्यात आला.
सैनिक मेळाव्यात देशसेवेची शपथ घेण्यात आली.