Saturday, December 28, 2024

/

‘बेळगावला शतकोत्सवी शिववर्ष होणार साजरं’

 belgaum

यावर्षी ६,७ व८ मे २०१९ पासून तीन दिवस भव्यदिव्य असा शतकोत्सवी  शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा  निर्णय मंगळवारच्या जत्तीमठातील मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकित परिसरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळ कार्यकर्ते हजर होते.

यावेळी शिवचित्ररथ मिरवणूक झाल्यावर वर्षभर अनेक उद्भोदक कार्यक्रम राबवण्याचे ठरले.त्यासाठी सर्व मंडळानी सहकार्य करुन बेळगावची शिवजयंती जगप्रसिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत यासाठी अनेकांनी विचार व्यक्त केले.खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कार्यकर्त्यानां शिवजयंतीला रितसर परवानगी मिळाली आहे तेंव्हा सर्व मंडळानीं शिस्तबद्धरित्या ८ रोजी चित्ररथ मिरवणूक साजरी करुन बेळगावच्या जनतेचा आदर्श दाखवून द्यावा असे आवाहन केले.अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक विजय पाटील होते.

SHiv jayanti
सोमवार दिं ६/५/२०१९ रोजी शिवजयंती निमित्त सकाळी ७ ते ८.३० पर्यंत धर्मवीर संभाजी चौकात अनेक गडावरुन मंडळानी आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे.सकाळी ९ वाजता नरगुंदकर भावे चौकात प्रतिष्ठापित केलेल्या शिवमूर्तीचे विधिवत पूजन,सकाळी १० वाजता शहापूर श्री शिवाजी उद्यानमधील शिवमूर्तीचे पूजन.हे सर्व कार्यक्रम मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे आयोजित केले जाणार आहेत. यात बेळगाव परिसरातील समस्त शिवप्रेमी मोठ्या संख्येंने हजर रहाणार आहेत त्यानंतर दिवसभरात श्री शिवजयंती निमित्त अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक शिस्तबद्धरित्या होण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून, सदर समिती प्रत्येक मंडळानां मिरवणूकीत वेळेवर येऊन समस्त जनतेला शिवरायांचे जिवनचरित्राची माहिती देऊन आनंद उपभोगूद्या अशी प्रत्यक्ष भेटून विनंती करणार आहेत.

हे वर्ष शिव वर्ष म्हणून साजरे केले जाईल त्या अंतर्गत वर्षभर भरगच्च कार्यक्रम आखले गेले आहेत विविध स्पर्धांचे आयोजन पोवाडे व्याख्याने आयोजित केली जाणार असून मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्यवर्ती चे प्रकाश मरगाळे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.