सरकारी कार्यालय म्हणजे विविध योजना आणि इतर माहिती देण्याचे साधन असते. मात्र नागरिकांना योजना पासून वंचित ठेवणे आणि स्वतः कुचकामी राहणे हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वतः शहाणपण सांगून इतरांना मात्र अंधारात ठेवण्याचे काम या सरकारी कार्यालयातून होते. बेळगाव येथील बागायत खात्याने असाच प्रकार केल्याचे निदर्शनास येत आहे.
बागायत खात्यासमोर असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणाचे नारे देणारे खाते दुसरीकडे आपल्याच कार्यालयासमोरील झाडांची कत्तल करतात. याला काय म्हणावे बेळगाव येथील बागायत कार्यालयासमोर उंच झाडे होती. सात ते आठ झाडांची कत्तल करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी तून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ही झाडे कशासाठी तोडण्यात आली याबाबत चौकशी केली असता झाडांच्या वरून विद्युत तारा गेले आहेत. त्यामुळे त्यांची कत्तल करावी लागले आहे. ही झाडे पुन्हा लवकरच उंच होतील असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काही फांद्या तोडल्या असत्या तर हा धोका टाळता आला. असता मात्र बागायत खात्याने अशी कोणतेच पाऊल उचलले नाही. सुमारे सात ते आठ झाडांची कत्तल करून पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे
ही झाडे तोडताना कोणताही विचार न करता तोडण्यात आली खरी मात्र एकीकडे पर्यावरण रक्षणाचा नारा देऊन अनेकांना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारी हे खाते स्वतः काय करत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढे तरी अशा चुका होणार नाहीत याची दखलही बागायत खाते घेणार का? की पुन्हा येरे माझ्या मागल्या असा सवाल उपस्थित होत आहे स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशाच पैकी हा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.