Thursday, January 9, 2025

/

बसम्मा ….तुझी जिद्द

 belgaum

अंधत्वाचा बाऊ न करता बसम्मा गुरय्या मठद या बारावीच्या विद्यार्थिनीने ९०.१६टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. बसम्मा ही लिंगराज कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी असून एकूण ८० विद्यार्थ्यापैकी एकमेव अंध विद्यार्थिनी होती.

bassamma

कॉलेजमध्ये तिच्यासाठी अंध आहे म्हणून वेगळ्या सुविधा नव्हत्या.केवळ जिद्द आणि अपार कष्ट यांच्या जोरावर अंध गुरुम्माने मिळवलेले यश हे कौतुकास्पद आणि डोळसानाही प्रेरणादायी असेच आहे.

हिंदी ९५,पॉलिटिकल सायन्स ८५,इकॉनॉमिक्स ९२ ,इंग्रजी ९३,सोशालॉजी ९४ असे गुण तिने मिळवले आहेत.६०० पैकी ५४० एकूण गुण गुरुम्माने मिळवले आहेत.दहावीला देखील तिने ६२५ पैकी ५९७ गुण मिळवले आहेत.ती उत्तम हार्मोनियम वादक असून स्कुल ऑफ म्युझिकमध्ये संगीताचे शिक्षणही गुरुम्मा घेत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.