1 काळ्या दिनी दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवलेल्या दोघा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोघा कार्यकर्त्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मारुती रामचंद्र देसुरकर आणि लोकेश लक्ष्मण पाटील दोघेही रा.बेनकनहळळी अशी जे एम एफ सी चतुर्थ न्यायालयाने निर्दोष केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहे.
1 नोव्हेंबर 2014 रोजी काळ्या दिनाच्या मिरवणुकी दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यानी गोवा वेस बसवेश्वर सर्कल जवळ अशोक स्तंभावर काळा ध्वज फडकवला होता त्यामुळे दोन भाषिकात तेढ निर्माण केला अशी फिर्याद माजी नगरसेवक दीपक जमखंडी यांनी टिळकवाडी पोलिसांत दाखल केली होती त्यानुसार या दोघांवर 153 अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सबळ साक्षी पुराव्या अभावी निर्दोष असा आदेश जे एम एफ सी चतुर्थ न्यायाधीश नरसिंह मूर्ती यांनी दिला आहे.वकील सुधीर चव्हाण आणि शाम पाटील यांनी समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं बाजू मांडली.