येळ्ळूर परिसरातील अनेक गावांतील जवळपास चाळीस हजार लोक संख्येला असलेले येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विकास कामांसाठी जिल्हा पंचायतीच्या निधीतून 34 लाख मंजूर झाले असून या कामांची सुरुवात आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी भूमिपूजन करून केलं.
आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्यांना सभा बैठका कामकाजासाठी घेण्यासाठी 9 लाख रुपये तर उरलेले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्य क्वाटर्स आणि इस्पितळ सौन्दर्यीकरण,इमारत सुसज्ज करून इतर सुविधा पुरवणे आदींसाठी वापरले जाणार आहेत.
जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी येळ्ळूर गाव आणि या मतदारसंघासाठी जिल्हा पंचायती तुन अनेक वेळा निधी मंजूर केला आहे त्यातुन प्राथमिक आरोग्य केंद्राचा देखील विकास केला जाणार आहे.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य मुकुंद घाडी,मार्कंडेय शुगर कारखाना सदस्य परशुराम कोलकार,रमेश धामणेकर,छ्त्रणावर आदी उपस्थित होते.