Thursday, January 9, 2025

/

उपराष्ट्रपती नायडू यांचा बेळगाव दौरा रद्द

 belgaum

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा बेळगाव दौरा रद्द झाला आहे सोमवारी ते व्ही टी यु मधील कार्यक्रमात सहभागी होणार होते.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सोमवारी देशभरात शासकीय शोक पाळण्यात येणार आहे त्यामुळे नायडू यांनी बेळगाव दौरा रद्द केला आहे.

Venkaiah naidu
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ते हैद्राबाद हुन खास विमानाने बेळगावला येणार होते कालच राष्ट्रीय शोक जाहीर केल्या नंतर उपराष्ट्रपती बेळगावला येणार नाहीत याची कुणकुण लागली होती मात्र बेळगावच्या अधिकारी याला दुजोरा देत नव्हते त्यामुळे ही घोषणा व्हायला वेळ झाला. सोमवारी सकाळी याची अधिकृत घोषणा झाली.

उपराष्ट्रपती बेळगाव ला येणार म्हणून कित्येक दिवसा पासून जययत तयारी करण्यात आली होती शहरातील रहदारी देखील मोठया प्रमाणात वळवून बदल करण्यात आला होता इतकेच काय तर दहावीच्या परीक्षा असल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यास विलंब होऊ नये म्हणून हेल्पलाईन देखील जाहीर केली होती.उपराष्ट्रपती यांच्या सह राज्यपाल वैजुभाई वाला यांनी देखील राष्ट्रीय शोक असल्याने बेळगावं दौरा रद्द केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.