Friday, December 27, 2024

/

बेळगावला आदर्श शहर बनवू- यु टी खादर

 belgaum

बेळगावला राज्य सरकार कडून  दरवर्षी 100 कोटी तर केंद्रा कडून 100 कोटी अशी पाच वर्षात एक हजार कोटीची विकास कामे होतील. भविष्यात बेळगाव शहर आदर्श शहर बनवू असा विश्वास नगरविकास मंत्री यु टी खादर यांनी व्यक्त केला.

बेळगाव शहरातील टिळकवाडी येथे नाथ पै उद्यानाचे स्मार्ट सिटी योजनेतून 96 कोटी सौन्दर्यीकरण उदघाटन केल्यावर ते बोलत होते.यावेळी महापौर बसप्पा चिखलदिनी,आमदार अभय पाटील उपमहापौर मधूश्री पुजारी आदी उपस्थित होते.

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेद्वारे जवळपास 400 कोटींची कामे सुरू आहेत आणखी चारशे कोटींची कामे टेंडर प्रोसेस मध्ये आहेत 100 कोटींच्या कामांचे आराखडे तयार आहेत आणि 100 कोटींची कामे आराखडे बनत आहेत तीन महिन्यात सर्व कामे सुरू होतील असं देखील ते म्हणाले.

Ut khadar

स्मार्ट सिटी निधीतून तब्बल 96 लाख रुपये खर्चून या उद्यानाचा कायापालट होत आहे. याचे काम सिव्हिल कंत्राटदार श्रीधर नागोजीचे केले असून गार्डनिंगचे काम कृष्णा चव्हाण यांनी केलंय

या उद्यानात वॉकींग जॉगिंग ट्रॅक बनवला असून 70 टक्के हुन अधिक भागाचे हिरवळीकरण झाले आहे इतकेच काय तर 70 नमुन्यांच्या फुलांच्या झाडांनी सजलेल्या गार्डन मध्ये चारी बाजूनी ख्रिसमस झाडे ग्रॅनाईट च्या सजावटीने बनवली जात आहेत. लँड स्केपिंग साठी हे उद्यान एक युनिक कन्सेप्ट आहे.स्वच्छतागृह एका कोपऱ्यात आहे. योगा डेक बनवला आहे कारंजा उकृष्ट बनवला जात आहे.बांबू चा वापर देखील चारी बाजूनी आहे त्यामुळे बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही.

स्मार्ट शहरासाठी आम्ही स्मार्ट गार्डन देण्याचा प्रयत्न केलाय यात जॉगिंग ट्रॅक मेडिटेशन डेक बनवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.