फेब्रुवारी पासून बेळगावमधून विमानसेवा सुरू केलेल्या स्टार एअर या कंपनीने आता आपल्या विमानसेवा कमी केल्या असून आठवड्यात फक्त 5 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. 31 मार्च पासून हा बदल होणार आहे.
सध्या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ही सेवा असून 1 एप्रिल नंतर त्यावर मर्यादा येणार आहेत.आणखी नवीन मार्गांची घोषणा करण्यासाठी आता बंगळूर साठीची सेवा कमी केली जात असल्याची शक्यता आहे.
कंपनीने आपल्या वेबसाईटवर अहमदाबाद साठी विमान सुरू करणार असे जाहीर केले असले तरी ते कुठल्या विमानतळावरून हे स्पष्ट केलेले नाही.मात्र या अगोदर स्टार एअर चे मालक संजय घोडावत यांनी बेळगाव अहमदाबाद सुरू करू असे सूतोवाच्य केले होते त्यामुळे वरील अहमदाबाद ची विमान सेवा बेळगाव हुन असू शकते.
एअर इंडिया ने सुद्धा आपल्या विमानसेवेत 26 मार्च नंतर आपल्या वेळापत्रकात बदल सुचवले असून ते काय असतील याकडे लक्ष आहे.