Friday, December 27, 2024

/

‘स्मार्ट रोडवर मातीत रुतला ट्रक’

 belgaum

रस्त्याच्या कामासाठी खडी घेऊन येणारा टिप्पर रस्त्यातच रुतल्यामुळे पांगुळ गल्लीतील नागरिकांना,व्यापाऱ्यांना आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना निष्कारण मनस्ताप सहन करावा लागला.

रस्ता रुंदीकरण झाल्यावर डांबरीकरणाचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे.परिणामी रस्त्यावरील मातीमुळे तेथील लोकांना आणि व्यापाऱ्यांना सकाळी आंघोळ केल्यावर दिवसभर अनेकदा मातीच्या धुळीची आंघोळ करण्याची नामुष्की ओढवली आहे.या गल्लीत मातीचे ढिगारे पडल्याने धुळीचे साम्राज्य तर निर्माण झालेच आहे या शिवाय खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी झाली आहे थेट व्होलसेल व्यापारा वर याचा परिणाम होत आहे.

रस्त्यावरून घरात आणि दुकानात सतत धूळ उडून येत असल्याने गृहिणी आणि व्यापाऱ्यांना साफसफाई करून करून वैताग आला आहे.पांगुळ गल्लीत सगळी होलसेल दुकाने आहेत.खरेदीसाठी येथे गावातून परगावातून लोक मोठ्या प्रमाणावर येतात.पण सोमवारी टिप्पर रस्त्यात रुतून बसल्यामुळे तेथील जनतेला आणि खरेदीसाठी आलेल्याना निष्कारण मनस्ताप सहन करावा लागला.

Pangul galli

पांगुळ गल्लीत अश्वत्थामा ऐतिहासिक मंदिर आहे दर वर्षी होळी निमित्त या मंदिराच्या समोर लोटांगण घातले जाते मात्र मास्टर प्लॅनच्या कामामुळे यावेळी लोटांगना पूर्वी रस्ता पूर्ण करण्यासाठी घिडसाईने काम पूर्ण केलं जातं आहे असा देखील आरोप होत आहे.

बेळगाव शहराची स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत निवड झाली असून केंद्राचा कोट्यवधींचा निधीही आला आहे.पण स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने मात्र नियोजनशून्य कारभार चालला आहे.रस्ता रुंदीकरण झाल्यावर रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे.स्थानिक लोक प्रतिनिधीने यांनी राणा भीमदेवी थाटात रस्ता रुंदीकरणाला प्रारंभ केला पण अनेक महिने काम रखडले आहे.शुभारंभ करायला लोक प्रतिनिधी येतात पण नंतर मात्र तोंड दाखवत नाहीत अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.