सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
पाणी बचाव आंदोलन पुकारून त्यासाठी सातत्याने पुढाकार घेण्याची क्षमता असलेली एक जागृत महिला ही डॉ आरती भंडारे यांची ओळख आहे. पाण्याचे महत्व सांगून ते वाचवण्यासाठी त्या सतत धडपड करीत आहेत. पाणी वाया घालवू नका हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे.
( फोटो :डॉ आरती भंडारे या पाणी वाचवा मोहिमेत एक शालेत व्याख्यान देतानाचा आहे )
त्या स्वतः डेंटिस्ट आहेत. एक यशस्वी उद्योजकाची पत्नी आणि एक माता असलेल्या डॉ आरती यांनी स्वतःहून शाळा कॉलेज मध्ये जाऊन प्रशिक्षण दिले आहे. कमीत कमी पाणी वापरून नासाडी कशी रोखायची याचे शिक्षण त्या देतात.
एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना मैलोन मैल चालावे लागत असताना आपण पाणी वाया घालवणे योग्य नाही. यासाठी नवीन पिढीला जागृत करून त्यांच्या हातून पाणी वाचवणे हे ध्येय घेऊन त्या धडपड करीत आहेत.