राणी चन्नाम्मा विद्यापीठाच्या वार्षिक ऑडिट रिपोर्ट मध्ये लॅपटॉप खरेदीतील घोळ समोर आला आहे.पदव्युत्तर आणि पीएचडी चे शिक्षण घेणाऱ्या एस सी एस टी विध्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आले होते. 48000 रुपये एक प्रमाणे 592 लॅपटॉप खरेदी करण्यात आले व त्याची रक्कम 2 कोटी 9 लाख 17 हजार 136 इतकी दाखवण्यात आली आहे. ऑडिट रिपोर्ट ने यात घोळ असल्याचे म्हटले आहे.
टेंडर काढून लॅपटॉप खरेदी करण्याचा प्रक्रियेत घोळ झाल्याचे उघड झाले आहे. पहिल्यांदा एक कमिटी नेमून दर अभ्यासण्यात आला पण आणि त्यानंतर भलत्या व्यक्ती कढून खरेदी करण्यात आल्याचे उघड होत असून कुलगुरू शिवानंद होसमनी यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
या ऑडिट रिपोर्ट वरून सरकार कोणती कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे. कमिशन च्या आशेने हा घोळ झाला असल्याचे बोलले जात असून इतर अनेक नियम डावलून हा व्यवहार झाला असल्याचे ऑडिट रिपोर्ट वरून स्पष्ट होत आहे.