होळी म्हटले की रंगांचा उत्सव आला आणि रंग बरसे असे म्हणत रंगोत्सवात नाचत-बागडत खेळण्याचा सण असतो. या सणाला यावर्षी महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी देखील दिनांक 21 मार्च रोजी सकाळी नऊपासून ध. संभाजी उद्यानात रंग बरसे हा खास कार्यक्रम होणार आहे .
या कार्यक्रमात बेळगावच्या प्रत्येक नागरिकाला सहभागी होता येणार असून रंगांचा उत्सव साजरा करण्याची सुंदर संधी उपलब्ध करण्यात आली आहे. पाण्याचा बेसुमार वापर होतो आणि पाण्याची नासाडी केली जाते मात्र रंग बरसे या कार्यक्रमात पाण्याचा कमीत कमी वापर करून रंगांचा वापर करून होळी खेळली जाणार आहे, अशी माहिती या आयोजक महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीने बेळगाव live शी बोलताना दिली.
होळीचा सण हा प्रत्येकाच्या दृष्टीने उत्साहाचा सण असतो आनंद भरण्याचे काम रंग बरसे कार्यक्रम करणार आहे. महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीने या कार्यक्रमाची इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण लगेचच याचे प्रायोजकत्व स्वीकारले असून प्रत्येकाची होळी आनंदी वातावरणात साजरी करण्याची संधी हा कार्यक्रम देणार असल्याची माहिती संजय कडोलकर यांनी दिली.
रंग बरसे कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी प्रमाणेच यावेळी देखील संगीत नृत्य असे कार्यक्रम आयोजित केले आहेत ध.संभाजी उद्यान मैदानावर यासाठी महिला आणि पुरुष असे वेगवेगळे विभाग केले जाणार आहेत या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीने केलं आहे.