ती ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ची घोषणा दुसऱ्याने दिली असल्याचे पोलिस तपासात उघड़ झाले आहे.रामदुर्ग येथील कंकणवाडी गावात एका काँग्रेस नेत्याने पाकिस्तानचा जयजयकार करणारी पोस्ट फेसबुकवर अपडेट केली होती . मात्र त्या नेत्याने ही पोस्ट आपण टाकली नसून माझे फेसबुक पेज हॅक केल्याची तक्रार झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी त्याच्या मित्रानेच त्या नेत्याचे फेसबुक पेज हॅक करून पाकिस्तानचा जयजयकार करणारी पोस्ट अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामदुर्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे
नागराज माळी वय 29 असे पेज हॅक करून पोस्ट अपलोड केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने काँग्रेसचे नेते महम्मदशफी बेंनी याचे फेसबुक पेज हॅक करून पाकिस्तानची नारेबाजी करणारी पोस्ट टाकली होती. 1 मार्च रोजी ही पोस्ट अपलोड करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. या घटनेनंतर बेंनी यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. या घटनेने खळबळ माजली होती
बेळगाव पोलीस दलातील आणि बेंगलोर येथील सीआयडी विभागातील सायबर क्राईम विभागाने या प्रकरणी कसून तपास केल्या नंतर नागराज माळी याला अटक केली आहे.
नागराज यानेच महम्मदशफी यांचे फेसबुक पेज ओपन करून ती पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट टाकली होती शफी यांचा पासवर्ड नागराज याला माहीत होता त्यामुळे त्याचे फेसबुक पेज हॅक करून हे घृण कृत्य केले आहे. नागराज विरुद्ध भा द वी 124ए, 154ए, 153बी व माहिती तंत्रज्ञान कायदा 66सी, 66बी कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्या वारंवार ही घटना घडत असून कारवाईची गरज निर्माण झाला आहे.
आपला फेस बुक पास वर्ड कुणालाही देऊ नये है वरील घटने मुळे सिद्ध झाले आहे.