बेळगाव जिल्ह्यात सध्या पीडिओच्या बदल्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. या बदल्या झाल्यातरी अजूनही हा घोळ संपत नसल्याचे दिसून येत आहे. काहीजण आपली बदली झाली त्या जागी रुजू झाले आहेत मात्र काही पीडिओ आहेत त्या जागीच असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेश यांनी केलेली ही कारवाई मुळे अनेक पीडीओची चांगलीच दमछाक उडाली आहे. काही पीडिओनी बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले तर अजूनही अनेकांची धडपड सुरू झाली आहे. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
नूतन कार्यकारी अधिकारी डॉ के व्ही राजेंद्र यांनी 578 ग्राम पंचायत मधील पीडिओ, सेक्रेटरी, सचिव आदी अधिकारी यांची बदली केली आहे. मात्र या बदलीचा घोळ अजूनही संपत नाही. काही ठिकाणी माया जमविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पीडिओ आपली बदली करून घेण्यासाठी संबंधित ग्राम पंचायत सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव तालुक्यास इतर तालुक्यातील पीडिओची बदली करण्यात आली आहे. मात्र त्याच तालुक्यातील पीडिओना तेथेच त्याच तालुक्यात ठेवण्यात आले आहे. साऱ्या पीडिओना दुसऱ्या तालुक्यात बदली करण्याची गरज निर्माण झाली आहे तेंव्हाच या पीडिओच्या कारनाम्याना रोख बसणार आहे. याचा विचार करून अशा प्रकारे बदली केल्यास अनेकांची चांगलीच गोची होंणार आहे.