मनोहर पर्रीकर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री. त्यांच्या झालेल्या निधना नंतर बेळगावातील त्यांच्या अनेक जवळच्या मित्र परिवाराने त्यांच्या सोबत घातलेल्या आणि बेळगाव बद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, आजगावकर परिवार यांच्या सहबबेळगावात त्यांचे वयक्तिक संबंध असणाऱ्यापैकी एक व्यक्ती म्हणजे उद्योजक आपासाहेब गुरव..आपासाहेब गुरव यांनी पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गुरव सांगतात की बेळगावचा आणि त्यांची जवळीक जास्त होती. व्यवसायामुळे ते नेहमी बेळगावला यायचे. बेळगावातुनअल्वानी वेल्डिंग रॉडस विकण्यासाठी ते येत होते त्यांनी त्यांचा गोवा हैड्रोलीक कारखाना सुरू केल्यानंतर 1986 च्या काळात त्यांचे बेळगावच्या प्रत्येक उद्योजकाशी चांगले सबंध झाले होते. आपलेही संबंध त्याचवेळीचे आहेत. काही काळा नंतर ते राजकारणात गेले. त्यानंतर ते विसरले असतील असे वाटून आम्ही संपर्क कमी केला होता पण मात्र एकदा गोव्यात पत्रकार परिषदेत त्यांनी बेळगावचे माझे मित्र म्हणून माझा उल्लेख केला होता त्यानंतर परत संबंध वाढले.
त्यानंतर ते बेळगावात विविध कार्यक्रमांना ते आले. मुख्यमंत्री असताना ते माझी लायन्स क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर ते आले होते.मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिल्यांदा बेळगावला माझ्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती.मीठ साखर विक्रेते आजगावकर यांच्या घरी ते नेहमी यायचे घरी बसत होते.ते एकदम साधी राहणीमान असलेले व्यक्तिमत्व होते.यामुळे त्यांच्या निधनाने आपल्याला भरपूर शोक झाला आहे. असेही गुरव यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.
आणखी एकदा बेळगावला ते यावेत असं माझं स्वप्न होत ते आता अधुर राहिलं 13 डिसेंबर वाढदिवस शुभेच्छा दिल्या होत्या 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी मला बोलावलं होतं म्हणजे 15 फेब्रुवारी आजारी व्हायच्या तीन दिवस अगोदर मी त्यांना भेटलो होतो..12 फेब्रुवारीला ज्या दिवशी मी त्यांना भेटलो सगळे अँपॉइंटमेंट ठेऊन मला वेळ दिला होत माझें कुटुंबीय त्यांना कार्यालयात भेटलो होतो तो दिवस अविस्मरणीय होता असेही त्यांनी नमूद केलंय.
अशा व्यक्तींचा सहवास लाभणे हेच भाग्य होय ।