बेळगाव शहरातील नागरिकांना त्यांची घरपट्टी ऑनलाईन भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव मनपाने 5 टक्के सवलत दिली आहे. बेळगावच्या सिटीझन कोन्सिलने ही मागणी कालच बेळगाव मनपा आयुक्तांकडे केली होती. दुसऱ्याच दिवशी ही मागणी मान्य करून मनपाने सिटिझन कोन्सिल चा आदर राखला आहे तसेच ऑनलाईन घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.
30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना ही सूट मिळणार आहे. हा आमचा आणि बेळगावच्या नागरिकांचा विजय आहे अशी माहिती सिटिझन कोन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव live ला दिली. कालच आम्ही मनपा आयुक्तांना भेटून ही मागणी केली होती आणि आज त्यांनी ही मागणी मान्य केली याबद्दल आम्ही मनपा आयुक्तांचे आभारी आहोत असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
मागील वर्षीचा कर थकीत असल्यास ही सवलत मिळणार नाही असे मनपा आयुक्तांनी एक प्रसिद्धी पत्रका नुसार कळवले आहे.
सतीश तेंडुलकर यांच्या सोबत सेवंतीलाल शहा, विकास कलघटगी व इतर सदस्यांनी ही बेळगाव शहरातील नागरिकांच्या हिताची मागणी केली होती.