महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि परिसरातील शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
या ठिकाणी भाविकांना मूर्तींवर दुधाचा अभिषेक न करता दूध देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कपिलेश्वर मंदिर येथे सकाळपासुन अभिषेकासाठी आलेले 200 हुन अधिक लिटर दुधाचे संकलन करण्यात आले. तसेच भक्तांकडून स्वीकारण्यात आलेल्या दुधाचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये वाटप आले.
गेल्या तीन वर्षांपासून कपिलेश्वर मंदिर येथे भाविकांनी आणलेल्या दुधाचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याला पहिल्या वर्षीपासून प्रतिसाद मिळत आहे. यावेळीही भक्तांना दुधाची नासाडी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला पहाटे पासूनच भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
दिवस भरातून 200 लीटर हुन अधिक दूध जमल होते त्याच पंचामृत करून प्रसाद म्हणून भक्तात वितरण करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रष्टिनी दिली आहे.