बेळगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून रिंगरोडला तक्रारी वाढत चालल्या आहेत. मुतगा भागातील शेतकऱ्यांनी आम्ही रिंगरोड होऊ देणार नाही या साठीच्या 64 तक्रारी सादर केल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हमपणावर यांच्याकडे तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर फक्त सही करून देण्यात येत होती, मात्र अष्टेकर यांनी आक्षेप ठेवून सही व शिक्का हवा अशी मागणी केले त्यामुळे अधिकाऱ्यांना शिक्का देऊन पोचपावती देण्यात आली आहे.
रिंग रोडला सर्व स्तरातून विरोध होत आहे. मुतगा भागातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध लावून धरला आहे. मोजमाप करणारे अधिकाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यापर्यंत त्या शेतकऱ्यांनी आपला पवित्रा घेतला असून आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे 64 तक्रारी दाखल करण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.