‘मनुष्य नावाने मोठा होत नाही तर तो त्याचे चरित्र आणि गुण यामुळे मोठा होतो ‘असे विचार इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जीवन मार्गदर्शक गौर गोपाल दास यांनी बोलताना व्यक्त केले.
बेळगावात आले असताना शनिवारी सकाळी इस्कॉनच्या भक्तांसाठी श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्री पुरुष भाविकानी तुडुंब भरलेल्या सभागृहात आपल्या दोन तासाच्या प्रवचनाने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले
श्रीमद् भागवतातील तिसऱ्या अध्यायातील चोविसाव्या श्लोकाचे त्यांनी वर्णन केले.
‘स य व भगवानद्य , हेलतं न गण यम:! गृहेष जातो ग्रामन्या य:स्वाना पक्ष पोषण :!!
या श्लोकाचा अर्थ त्यांनी कथन केला. करदम मुनींनी कपिल मुनींना जे सांगितले ते या श्लोकात नमूद करण्यात आले आहे.
मेटल डिटेक्टर? ने धातूचे डिटेक्शन करता येते पण समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार भगवंताशिवाय ओळखू शकत नाहीत ते मेंटल डिटेक्टर आहेत ‘असे ते म्हणाले
‘एखाद्याच्या चुका दुर्लक्षित करण्याची गरज प्रतिपादन करून गौर गोपालदास म्हणाले की ‘भगवंताचा हा गुण जर आपल्या जीवनात आला तर आपले जीवन कीतीतरी सुखी होईल
लोक पाच स्तरावर असतात असे प्रभुपदानि सांगितले आहे त्यातल्या पहिल्या स्तरात लोकांची फक्त वाईट कृत्ये पाहणारे, दुसऱ्या स्तरात लोकांचे चांगले व वाईट पाहणारे पण चांगुलपणाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुर्गुणांचा विचार करणारे,तिसर्या स्तरात चांगले-वाईट बघून उदासीन असणारे लोक आहेत. चौथ्या स्तरात समोरच्या माणसातील चांगले वाईट गुण पाहून त्यांच्या वाईट गुनाकडे दुर्लक्ष करणारे तर पाचव्या स्तरात दुसऱ्यांचे केवळ चांगलेच पाहणारे लोक असतात. यापैकी जोपर्यंत आपण चौथ्या स्तरावर पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या नात्यांमध्ये आनंदी वातावरण असू शकत नाही. भगवंताची जशी रूपे अनेक आहेत तसेच त्यांची नावे व लीला ही अनेक आहेत असेही ते म्हणाले
गौर गोपाल दास यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हास्याच्या ललकारात आपल्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले .त्यांच्या प्रवचनाने आनंदित झालेल्या उपस्थितांना दोन तास केव्हा संपले हे समजले नाही