Thursday, December 26, 2024

/

नंदीहळ्ळी यांच्या खुनाचे कारण काय?

 belgaum

स्वतःच्या स्विफ्ट कारने धामणे येथून अनगोळकडे येत असताना माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचे चिरंजीव अरुण परशुरामभाऊ नंदीहळ्ळी( वय 45) यांचा अज्ञातांनी गोळ्या घालून खून केला आहे. कार अडवून त्यांना बाहेर काढून अज्ञातांनी हा खून केला आहे.


धामणे गावा पासून जवळच हा खून झाला आहे. अरुण हे विश्वभारत सेवा समितीत होते, पिता परशुरामभाऊ यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील हक्कावरून सुरू वादात त्यांचे तिसरे चिरंजीव असलेल्या अरुण यांचासुद्धा सहभाग होता.
धामणे येथे रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे. अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे.

त्यांना जखमी अवस्थेत येळ्ळूर रोडवर के एल ई हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊन उपचार करण्याचा प्रयत्न झाला पण यश आले नाही.

पोलीसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आहे. अरुण यांचे दोन विवाह झाले आहेत, एक पत्नी अनगोळ व दुसरी धामणे येथे असतात. धामणे येथील पत्नीकडे जाऊन जेवण करून ते परत येत होते.
अरुण यांना मागील काही दिवसांपासून अज्ञात कॉल येत होते व त्यांचे लोकेशन शोधायचा प्रयत्न सुद्धा सुरू होता. पण त्यांचा खून कुणी केला याचा शोधाशोध सुरू आहे.

विश्व भारत सेवा शिक्षण संस्थेत शिक्षक भरती करतो म्हणून काही लोकांकडून पैसे घेतले होते अनेकांनी पैसे वापसीसाठी तगादा लावला होता यातून हा प्रकार झाला की काय असा संशय देखील व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.